
कुडाळ : तालुक्यातील बाव गावातील कन्या दिपाली दिनेश गावकर हिची सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी लेफ्टनंट दिपाली गांवकरचे आई-वडील देखील उपस्थित होते.