
दोडामार्ग : परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतींची विटंबना करणाऱ्या व्यक्तींवर देशद्रोही कायद्यानुसार शिक्षा व्हावी. व निरपरात बौद्धांची कोंबिंग ऑपरेशन अंतर्गत पोलीस कारवाई थांबवावी या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा व सामाजिक संघटना शाखा दोडामार्ग यांनी दोडामार्ग तहसीलदार व पोलीस ठाणे यांना निवेदन दिले.
या निवेदनात असे म्हटले की परभणी येथे दिनांक 10 डिसेंबर रोजी देशद्रोही व्यक्तीने भारतीय संविधानाच्या प्रतिकृतींची विटंबना केली. त्या संबंधित व्यक्तीवर देशद्रोही कायद्यानुसार त्याला शिक्षा व्हावी. व निरपरात बौद्धांची आंबेडकर वाद्यांची कोंबिंग ऑपरेशन होणारी पोलीस कारवाई थांबवावी. अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे भारतीय बौद्ध महासंघ व सामाजिक संघटना दोडामार्ग यांनी केली आहे. यावेळी श्रीधर जाधव, संतोष हेवाळकर, विनोद कदम, नवसो कदम, उदय जाधव, अर्जुन कदम, मधु कदम, प्रतीक्षा हेवाळकर आधी उपस्थित होते.