
सावंतवाडी : महाराष्ट्राचे शिक्षण तसेच मराठी भाषा मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच येत्या दि. १८ जुलै रोजी सावंतवाडी एसटीस बस स्थानक व्यवस्थेसाठी आंदोलन होणार आहे असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सिंधुदुर्ग राज्य परिवहन महामंडळाला हा शेवटचा इशारा दिला आहे.
साळगावकर म्हणाले,पुढच्या अठरा दिवसाच्या आत महामंडळाच्या वतीने होत असलेले प्रवासालांचे हाल बघवत नाही. विद्यार्थी, शिक्षक, निम सरकारी कर्मचारी, शासकीय कर्मचारी, प्रवासी, कष्टकरी गावातून येणारे शेतकरी शहरांमध्ये येणारे नोकरदार कर्मचारी यांना जीव मुठीत घेऊन कसरत करावी लागत आहे एसटी बस स्थानकाची झालेली दयनीय अवस्था सुधारा, एसटी बस स्थानक सर्व परिसर स्वच्छ करा, प्रवाशांना मूलभूत सुविधा द्या, बस स्थानका मध्ये गळत आहे. त्या ठिकाणी पत्रे घाला. गळत्या काढा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानकातील शौचालय स्वच्छ शौचालय असायला हवं याकडे जातीने लक्ष्यात तसेच संपूर्ण परिसर रात्रीच्या वेळी काळोखात बुडालेला असतो आवश्यक त्या सर्व लाईट सुरु करा पुढच्या अठरा दिवसांमध्ये या सर्व समस्या सोडवा अन्यथा दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसा दिनीच प्रखर जन आंदोलन उभारले जाईल. त्याची पूर्ण जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्हा राज्य परिवहन महामंडळावरती राहील, असा इशारा साळगावकर यांनी दिला आहे.
सावंतवाडी एसटी बस स्थानक तसेच आंबोली एसटी बस स्थानक हे दोन्ही विषय आम्ही हातात घेतले आहेत दोन्ही विषय धासास लावू. आंबोली हे बस स्थानक अद्यावत असायला हवं तिथेही दुरवस्था आहे. येत्या अठरा दिवसांमध्ये एसटी महामंडळाने सर्व कामे न केल्यास आंदोलन करण्यात येणार आहे असे साळगावकर यांनी सांगितले.