
कणकवली: कणकवली उड्डाणपूलाखाली भाजी, फळ, फुल विक्रेते आणि स्टोलधारकांनवर महामार्ग प्राधिकरणाने कारवाई केल्यानंतर आता हे सर्वच विक्रेते आता एकवटले आहेत. आणि उद्या कणकवली पटवर्धन चौका मध्ये सकाळी 10 वा जमून महामार्ग प्राधिकरणाचा निषेध नोंदविणार आहे.तसेच कणकवली पटकी देवी मंदिर ते पटवर्धन चौक येथे हाताला काळ्या फीत बांधत महामार्ग प्राधिकरणाचा निषेध मोर्चा देखील काढणार असल्याचे भाजी विक्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कणकवली आचरेकर प्रतिष्ठान येथे शुक्रवारी रात्री उशिरा सर्व भाजी फळ विक्रेते स्टॉल धारक आणि रस्त्यावर बसणारे व्यापाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत सुजित जाधव यांनी धन्य दांडग्यांना न्याय देण्याऐवजी सामान्य माणसाला न्याय द्यावा आरो-डब्लूच्या आत मध्ये असलेली बांधकामे कधी तोडणार असा प्रश्न देखील उपस्थित केला
व अण्णा काणेकर यांनी नगरपंचायतने गेली तीस वर्ष आम्हाला जागाच उपलब्ध करून दिली नाही अशी खंत देखील व्यक्त केली.त्यामुळे उद्या सर्वच भाजी फळवाले स्टॉल धारक व रस्त्यावर बसणारे व्यापारी हे सर्वजण आपली दुकाने बंद ठेवणार असल्याने कणकवली मध्ये उद्या भाजीपाला फळे आणि फुले सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे भाजी विक्रेते यांनी सांगितले. यावेळी अनिल हळदीवे, दादा पावस्कर, लल्लू पावस्कर ,राजू पेंढुरकर, काणेकर, वैभव मालनकर, सुजित जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने भाजी ,फळ,फुलवले, स्टोल धारक उपस्थित होते