
सावंतवाडी : शहरात अनेक ठीकाणी जीर्ण झालेले खांब रस्स्त्याल अडथळा ठरतील अशा अवस्थेत टाकलेले आहेत. ते तात्काळ दूर करावे. अन्यथाा, 15 ऑगस्टला सावंतवाडी वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा भाजपाचे जिल्हा कार्यकारीणी सदस्य अजय गोंदावळे यांनी दिला आहे.
शहरातील अनेक खांब जीर्ण झाले आहेत. काही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. याबाब वारंवार लक्ष वेधून सुध्दा वीज वितरणचे अधिकारी सुशेगाद आहेत असा आरोप श्री.गोंदावळे यांनी केला आहे. सावंतवाडी शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला बदलण्यात आलेले किंवा बदलण्यासाठी आणलेले विज खांब तसेच आहेत. काही खांब जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे अपघात होऊन धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने याबाबत योग्य ती सकारात्मक भूमिका घ्यावी. अन्यथा, आपण आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे