मंत्री केसकरांच्या घरासमोर आंदोलन ; 16 जणांना सशर्त जामीन

Edited by: विनायक गांवस
Published on: August 06, 2024 10:40 AM
views 319  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएड बेरोजगार यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा युवासेनेच्यावतीने राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात त्यांच्या सावंतवाडी येथील घरासमोर आंदोलन केले होते. 

त्या प्रकरणी मंदार श्रीकृष्ण शिरसाट, योगेश धुरी, अमित राणे, संदीप महाडेश्वर, धीरेंद्र चव्हाण, अमित भोगले, सागर नाणोसकर, राजेश शेटकर, गुणाजी गावडे, विष्णू उर्फ आबा सावंत, योगेश नाईक, काजल सावंत, निनाक्षी मेथर, तेजस्वी परब, सोनाली सावंत, पायल आढाव यांना आज सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांची प्रत्येकी ५ हजारच्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली. याकामी ॲड. नीलिमा सावंत-गावडे, ॲड.सायली सावंत, ॲड. कौस्तुभ गावडे यांनी काम पाहिले.