अमित सामंतांच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी देण्यात आलेल्या फायबरचा योग्य वापर

Edited by: विनायक गावस
Published on: July 21, 2023 13:35 PM
views 144  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बांधातील पूर परिस्थितीचा विचार करता बांधा परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली असून गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना बचावात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फायबर देण्यात आले होते.

याच फायबर चा उपयोग यावर्षी पूरकस्थितीमध्ये योग्यरीत्या करताना नागरिकांनी सामंत यांचे आभार मानले आहेत. गेल्यावर्षी अशाच पूर परिस्थितीचा आढावा घेत सामंत यांनी फायबर देण्याचे आश्वासन देऊन ते आश्वासन पूर्णही केले होते निष्क्रिय अध्यक्ष असे म्हणणाऱ्यांनी डोळ्यात अंजन घालून पहावं की गेल्या वर्षी पूरग्रस्त असलेल्या व्यक्तींना दिलेल्या फायबरचा उपयोग आजच्या परिस्थितीला होत आहे.