प्रथमोपचाराचे योग्य ज्ञान हा लहान मुलांना होणाऱ्या गंभीर दुखापती टाळण्याचा सोपा मार्ग !

डॉ.दत्तप्रसाद सावंत, डॉ. नेहा कांबळे यांची महत्वाची माहिती
Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 27, 2024 12:40 PM
views 135  views

देवगड : देवगड येथील डॉ. दत्तप्रसाद सावंत आणि मुंबई येथील डॉ. नेहा कांबळे यांनी केलेल्या निरीक्षणात्मक अभ्यासातून लहान मुलांना अनावधानाने झालेल्या इजा व त्यांच्या पालकांना असलेले प्रथमोपचाराचे ज्ञान यातला परस्परसंबंध आढळून आला आहे. पालकांना असलेली प्रथमोपचाराची अचूक माहिती पाल्यांना कोणत्याही प्रकारच्या इजा होण्यापासून प्रतिबंध करते हे डॉ. सावंत अणि डॉ. कांबळे यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. हा शोधनिबंध इन्ज्युरी प्रिव्हे न्शन या ख्यातनाम आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रसिद्ध झाला आहे. अनवधानाने झालेल्या इजा किंवा अहेतुक इजा यांना इंग्रजीमध्ये अनइनटेन्शनल इन्ज्युरी असे म्हणतात. उंचावरून पडणे, खरचटणे, पाण्यात बुडणे, विजेचा धक्का लागणे किंवा रस्त्यावर वाहनांची धडक लागून होणाऱ्या इजा या सर्वांचा समावेश अनावधानाने झालेल्या इजांमध्ये होतो. याउलट एखाद्याला ठरवून दुखापत करणे, खून करणे अथवा अम्महत्या करणे यांचा सम्मम्रोश सहेतुक म्हणजे इनटेन्शनल इन्ज्युरी यामध्ये होतो. वर वर पाहता या दुखापती सर्वांना ज्ञात असल्या तरी या दुखापतीमुळे दरवर्षी भारतात अनेक बळी जात असतात. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे अहेतुक इजांमुळे भारतात दरवर्षी किमान एक लाख मुलांचाबळी जातो. कोणत्याही असाध्य रोगापेक्षा जास्त बळी या वरकरणी सामान्य वाटणाऱ्या दुखपतींमुळे होतात. लहान मुलांचा नाहक जीव जाण्यास कारणीभूत असणाऱ्या या दुखापती १००% टाळता येऊ शकतात असे खुद्द जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. मात्र यासाठी सर्वप्रथम अशा इजांचे प्रमाण किती आहे तसेच किती लहान मुले प्राणास मुकली आहेत हे शोधून काढणे महत्त्वाचे असते. हाच धागा पकडून डॉ. सावंत यांनी हा विषय त्यांच्या एमडी अभ्यासक्रमाच्या प्रबंधासाठी निवडला.

भारतात लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे आणि त्याचबरोबर त्यांना होणात्या वेगवेगळ्या दुखपतींचे प्रमाणही जास्त आहे. परंतु एवढा महत्त्वाचा विषय असूनही अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी याकडे म्हणावे तसे लक्ष दिलेले नव्ह ते. त्यामुळे डॉ. सावंत आणि त्यांचे मार्गदर्शक दिवंगत डॉ. दिलीप कदम यांनी मुंबई महानगरातील मालवणी या झोपडपट्टीबहुल भागाची त्यांच्या अभ्यासासाठी निवड केली. या भागातील १४ वर्षांखालील मुलांमध्ये अनावधानाने इजा झाल्यास त्यांचे पालक काय करतात आणि पालकांच्या प्रथमोपचाराच्या ज्ञानामुळे दुखापत न होण्यास काही मदत होते का हे शोधणे अभ्यासाचे प्रमुख उद्दिष्ट होते. यानुसार डॉ. सावंत यांनी तब्बल ३७३ मुलांचा अभ्यास केला आणि त्यांच्या पालकांची मुलाखत घेतली. मिळालेल्या माहितीचे वैज्ञानिक दृष्ट्या पृथ्थकरण केले. दरम्यान डॉ. दिलीप कदम यांचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे संशोधन पूर्ण होण्यात मोठा अडथळा निर्माण झाला. मात्र डॉ. सावंत यांनी चिकाटीने संशोधन प्रकल्प पूर्णत्वास नेला. संशोधन पूर्ण होणे ही पहिली पायरी होती. हे संशोधन प्रसिध्द होऊन त्याचा सामान्य लोकांना उपयोग होणे हे दुसरे काम अजून अपूर्ण होते. डॉ. कांबळे यांनी हे काम हाती घेतले. आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध होईल या योग्यतेचा लेख दोन्ही डॉक्टरांनी मिळून बनवला. जवळपास ७ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हे संशोधन 'ब्रिटिश मेडिकल जर्नल (बीएमजे)' या वैद्यकीय क्षेत्रातील जगात चौथ्या क्रमांकावर असलेल्या संशोधन समूहाच्या इन्ज्युरी प्रिव्हेन्शन या जर्नलमध्ये २६ एप्रिल २०२४ रोजी प्रसिद्ध झाले.

या संशोधनातून काही रंजक बाबी उजेडात आल्या. ३७३ मुलांच्या पालकांपैकी सुमारे ७०% पालकांना प्रथमोपचार ही संकल्पनाच माहीत नव्हती. ज्या ३०% पालकांना प्रथमोपचाराबद्दल माहिती होती, ती त्यांच्या नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून मिळाली होती. केवळ १५% पालकांनी त्यांच्या घरात प्रथमोपचाराचे कीट किंवा त्यातली काही औषधे ठेवली होती. या संपूर्ण संशोधनात १४ वर्षांखालील लहान मुलांना झालेल्या एकूण १९६ दुखपतींची नोंद करण्यात आली. या दुखापती झाल्यावर उपचारासाठी त्यांच्या पालकांनी काय केले याचीही माहिती मिळवण्यात आली. दुखपतीचा प्रकार, शरीराच्या कोणत्या भागाला दुखापत झाली आहे आणि मुलाला कोणत्या अवस्थेत दुखापत झाली आहे या गोष्टींमुळे पालकांच्या कृतीवर मोठा फरक पडतो असे दिसून आले. ४२% पालक त्यांच्या मुलांना इजा झाल्यावर डॉक्टरकडे घेऊन गेले. मात्र १७% पालकांना इजा झाल्यावर काय करावे हे सुचले नाही व त्यामुळे त्यांनी कोणतीही कृती केली नाही. पालकांचे शिक्षण आणि प्रथमोपचाराचे व अहेतुक इजांचे ज्ञान यामध्ये महत्वाचा परस्परसंबंध आहे असे सांख्यिकीशास्त्रानुसार सिद्ध झाले.

पालकांचे प्रथमोपचाराचे ज्ञान व लहान मुलांना होणाऱ्या इजांची माहिती वाढविण्यासाठी त्यांना आरोग्य शिक्षण देणे फार महत्त्वाचे आहे असे मूलभूत संशोधन डॉ. सावंत आणि डॉ. कांबळे यांच्या अभ्यासातून समोर आले आहे. लहान मुलांना गंभीर इजा झाल्यास त्यावर होणाऱ्या उपचाराचा खर्च तसेच मुलाचा हकनाक बळी जाण्याच्या घटना त्या कुटुंबाला मानसिक व आर्थिकदृष्ट्या उध्वस्त करू शकतात. हे टाळण्यासाठी सगळ्यांत सोपा उपाय म्हणजे पालकांना लहान मुलांना कशाप्रकारे इजा होऊ शकतात याची माहिती व प्रथमोपचाराचे प्राथमिकशिक्षण देणे हा होय. कोणताही अवास्तव खर्च न करता या साध्या आरोग्यशिक्षणाने अनेक कोवळे जीव वाचू शकतात किंवात्यांना होणफ्या शरी रिक त्रासाला प्रतिबंध होऊ शकतो.

"भारतात वैद्यक क्षेत्र खूप पुढारलेले असूनही लहान मुलांना होणाऱ्या दुखपतींवर अजून पुरेसा अभ्यास इमेला नाही. मुंबई शहरात झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांचे आयुष्य अनेक धोक्मी भरलेले असते. आमच्या संशोधनातून अगदी सोप्या आरोग्य शिक्षणाने मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. लहान मुले ही देशाची संपत्ती आहेत आणि एरवी टाळता येऊ शकणाऱ्या कारणांमुळे त्यांना शारीरिक दुखापती व्हाव्यात हा खरंतर दुर्दैवी प्रकार म्हणायला हवा. या विषयात अभ्यासला खूप जास्त संधी आहे."

डॉ. दत्तप्रसाद सावंत, एमडी, सहाय्यक प्राध्यापक, जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग "लहान वय हे नवनवीन गोष्टी शोधण्या चे असते, मात्र त्याच वेळी अनेक दुखपतींना आमंत्रण देणारेही असते. उंचावरून पडण्यापासून ते पाण्यात बुडण्यापर्यंत अने क प्र का रचे धोके लहान मुलांना असतात. अगदी स्वतःच्या घरातही हे धोके कमी होत नहीत. मात्र मुलांवर असलेले लक्ष, प्रथमोपचाराचे योग्य ज्ञान आणि प्रतिबंधात्मक उपाय यामुळे लहान मुलांचे जीवन अधिक सुरक्षित बनवता येऊ शकते."

डॉ. नेहा कांबळे, एमडी, सहाय्यक प्राध्यापक, तेरणा वैद्यकीय महा विद्यालय, नवी मुंबई. डॉ. सावंत आणि डॉ. कांबळे हे 'ग्रास ज्यूल सोल्यूशन्स' या संशोधन फर्मच्या माध्यमातून वैद्यकीय संशोधनाचे काम करतात. अनेक वैद्यकीय शाखांचे विद्यार्थी तसेच खाजगी डॉक्टर्सना त्यांचे काम राष्ट्री य तसेच आंतरराष्ट्री य पातळीवर शोधनिबंधांच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात या दोघमी मोलाचा वाटा उचलला आहे.