शेतकरी मार्गदर्शन शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 19, 2024 11:50 AM
views 148  views

देवगड : देवगड येथील आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ यांच्या वतीने शेतकरी आंबा बागायतदरांच्या संघर्षाला बळ मिळावे यासाठी बुधवार दि. १७ जानेवारी २०२४ ला सायंकाळी ५ वा. वाळकेवाडी येथील मंदिर सभागृहात शेतकरी तथा आंबा बागायतदार यांच्या वतीने शेतकरी मार्गदर्शक मेळावा व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी याबाबत सोमवार दि.१५ जानेवारी २०२४ ला अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध खात्यांना निवेदने देण्यात आले होते. परंतु केवळ निवेदने देऊन प्रश्न मिटणार नाही.आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही.त्या साठी या वेळी चर्चा सत्रा चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष विलास रूमडे, खजिनदार शुभम चौगुले, सेक्रेटरी संकेत लब्दे, उपाध्यक्ष आप्पा अनुभवणे, संचालक संजय धुरी, चंद्रकांत गोईम, निलेश पेडणेकर, सुधाकर वाळके, गुरुनाथ राणे, सत्यवान गावकर, प्रकाश डामरी, तसेच शेतकरी तथा आंबा बागायतदार अरविंद वाळके,राजेश वाळके, अजित वाळके, व मोठ्या प्रमाणात शेतकरी तथा आंबा बागायतदार सहभागी झाले होते.

या वेळी आंबा या विषयावर चांगली चर्चा या दरम्यान झाली. आंबा झाडांवरील रोग त्यावरील उपाययोजना तसेच बोगस औषधे आणि त्यामधून होणारी शेतकऱ्यांचीआर्थिक फसवणूक अशा अनेक मुद्द्यांवर या चर्चेदरम्यान चर्चा झाली.यावेळी या चर्चा सत्राचे प्रास्ताविक प्राध्यापक संजय धुरी यांनी केले. तर आभार राजेश वाळके यांनी तर स्वागत दीपक वाळके यांनी केले.चर्चेमध्ये शैलेश बोंडाळे,अरविंद वाळके,राजेश वाळके,आदींनी आपापले विचार व्यक्त केले.या वेळी सर्व शेतकरी बांधव आंबा बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.