तलाठी शरद शिरसाट यांची बढती

कसई - दोडामार्गचे मंडळ अधिकारीपदाचा स्वीकारणार कार्यभार
Edited by: संदीप देसाई
Published on: May 17, 2023 19:04 PM
views 132  views

दोडामार्ग : कर्तव्यदक्ष तलाठी म्हणून कार्यरत असणारे झरे-२ येथील तलाठी व पुनर्वसन पाल येथील रहिवाशी शरद शिरसाट यांची मंडळ अधिकारीपदी पदोन्नती झाली आहे. तालुक्यातील  कसई - दोडामार्गचे मंडळ अधिकारी म्हणून ते बढतीने कार्यभार स्वीकारणार आहेत.

 सध्या ते तेरवण मेढे व झरेबांबर या ठिकाणी तलाठी म्हणून काम पाहत आहेत, कामातील कर्तव्य दक्षता, तळमळ, सतत उत्कृष्ट काम यामुळे शासनाने त्यांचा पदोन्नती देऊन गौरव केला आहे, याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.