
देवगड : दिवसाला शंभर रुपये मानधन घेणा-या मदतनीसांना मार्चपासून मानधन मिळाले नाही म्हणून आगामी होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत घंटानाद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट नुकतीच झाली भेटीदरम्यान मानधन चार दिवसात जमा करण्याचे आश्वासन दिल्यामुळे दिनांक २७/६/२०२४ रोजी ओरोस येथे अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी संघटनेचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
या आंदोलनाचा इशारा देताच फेब्रुवारी,मार्च, एप्रिल,मे चे मानधन दोन दिवसांत जमा करण्याचे आश्वासन दिले म्हणून अधिवेशनात पहिल्या दिवसापासून होणारे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे .आशी माहिती रावजी यादव यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी संघटनेमध्ये फुट पाडण्याचे मनसुबे धुळीला मिळाले.चार महिने मानधनापासून वंचित ठेवण्यात गल्लेलठ्ठ पगार घेणाऱ्यांकडून होणारे प्रयत्न फोल ठरले. यावेळी अतिरिक्त महासचिव रावजी यादव, लेखाधिकारी चिंदरकर , जिल्हाध्यक्षा उषा नारायण लाड, जेष्ठ उपाध्यक्षा सुशिला भदू आईर, रेश्मा सुधीर डिचोलकर, श्रेया सिताराम कापडोसकर, कौशल्या दशरथ धुरी, शोभा श्रीधर मालवणकर, दिपाली दिगंबर पवार, निर्मलाताई निलेश हिंदळेकर,अरुणा अरुण कामतेकर,वंदना विश्वास साटम उपस्थित होते.