
कुडाळ : निवती समुद्रकिनारावर मंजूर झालेला पाणबुडी प्रकल्प हा 2017 साली मी अर्थमंत्री असताना याला पैशाची तरतूद करून दिली होती. मात्र, यानंतर आलेल्या पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी याकडे लक्षच दिले नाही. ते एवढे अज्ञानी होते की पाणबुडी पाण्यात बुडणार तर नाही ना ? असा प्रश्न पाणबुडीबाबत आदित्य ठाकरेंनी मला विचारला होता. पाण्यात बुडली तर काय होईल ? अशीही त्यांची शंका होती. त्यांना एवढं माहीत नव्हतं की पाणबुडी पाण्यातच वापरली जाते अस मत मंत्री केसरकर यांनी व्यक्त केलं.
आदित्य ठाकरे यांच्या ह्या अज्ञानपणामुळे आणि दुर्लक्षेतेमुळे हा प्रकल्प तसाच पडून राहिला होता. या प्रकल्पाला असलेल्या निधी तब्बल सात वर्षे पडून राहिला. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी उगाच दिशाभूल करू नये. जे आमदार वैभव नाईक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पैशाची तरतूद करून ठेवली म्हणून सांगतात. हे साफ चुकीचे असून ते जनतेची दिशाभूल करत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकही रूपया या प्रकल्पाला दिला नाही. खरं तर हा प्रकल्प कुठेही गुजरातला गेला नाही. त्यामुळे उगाचच विरोधाला विरोध करून आमदार वैभव नाईक यांनी हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला अशी ओरड मारत बसू नये. माझ्या मतदारसंघातील हा प्रकल्प असून येत्या सहा महिन्यांमध्ये हा पाणबुडी प्रकल्प मी निवती येथे करून दाखवणारच. मात्र, विरोधाला विरोध करण्याची भूमिका वैभव नाईक यांनी सोडून द्यावी आणि जनतेची दिशाभूल थांबावी असे दीपक केसरकर यांनी कोकणसादशी बोलताना स्पष्ट केले. निवतीतील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला या वैभव नाईक यांच्या आरोपावर दीपक केसरकर बोलत होते. यावेळी त्यांनी वैभव नाईक यांना चांगलेच खडेबोल सुनावले. तर भविष्यात २०२४ मध्ये मी माझ्या मतदारसंघात विकासाची गंगा आणणार असून विरोधकांनी उगाजच विरोधाला विरोध करू नये असे केसरकर यांनी बोलताना स्पष्ट केले.










