कोलगावात 'प्रकल्प मूल्यमापन कार्यशाळा'

Edited by: विनायक गांवस
Published on: October 31, 2025 16:45 PM
views 70  views

सावंतवाडी : प्रेरणा प्रभागसंघ, कोलगावची PRI-CBO convergence अंतर्गत 'प्रकल्प मूल्यमापन कार्यशाळा' कोलगाव सोसायटी सभागृह येथे पार पडली. ह्या कार्यशाळेस कोलगाव  सरपंच संतोष राऊळ व ग्रामविकास अधिकारी अरुण जाधव, कुणकेरी सरपंच सोनिया सावंत व उपसरपंच सुनील परब, कारिवडे सरपंच आरती माळकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक माळकर व आंबेगाव उपसरपंच रमेश गावडे उपस्थित होते.

तसेच कुडुंब श्री केरळ NRO च्या मेंटॉर गिरिजा संतोष ,तालुका अभियान कक्षातून BM MIS शिवानंद गवंडे  उपस्थित होते. तसेच DRP श्रावणी वेटे, BRP प्राची राऊळ,  प्रभागसंघ अध्यक्ष सविता कासार, सचिव क्षितिजा कोषाध्यक्ष लीना आलमेडा व कार्यकारी समिती सदस्य, सर्व  LRP ताई , CRP ताई, लिपिका, बालसभा व अक्षर ज्योती प्रकल्पाचे लाभार्थी ह्या कार्यशाळेत उपस्थित होते. 

प्रार्थना व  मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित सर्व  मान्यवरांचे प्रभागसंघ अध्यक्ष सविता कासार यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.DRP श्रीमती श्रावण वेटे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. यानंतर मान्यवरांनी  प्रकल्पांतर्गत केलेल्या विविध उपक्रमांची प्रदर्शनी बघितली. म्हारकटेवाडी बालसभा आंबेगाव प्रतिनिधी कु प्रथमेश कडव व विद्या जंगले, लय भारी बालसभा,कारिवडे चे प्रतिनिधी सानिका सावंत, कावेरी व विठ्ठल सकपाळ, अक्षर ज्योती उपक्रमाचे लाभार्थी श्रीमती विनिता जाधव व गंगा जाधव तसेच LRP हर्षदा कारीवडेकर, साक्षी राऊळ, वेदिया सावंत, रेखा डंकी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून केलेल्या कामाचे व प्रदर्शनीचे कौतुक केले. कोलगाव सरपंच श्री. राऊळ यांनी "ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीत  बचत गटातील महिलांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणार" असे जाहीर केले. प्रभाग समन्वयक अभय भिडे यांनी सर्व मान्यवरांचे प्रेरणा प्रभागसंघ व उमेद अभियानाच्या वतीने आभार व्यक्त केले. यानंतर वंदे मातरमने कार्यशाळेची सांगता झाली.