मंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 10, 2025 16:05 PM
views 351  views

कणकवली : मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे  पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २० ते २३ जून या कालावधीत संदेश उर्फ गोट्या सावंत व समीर नलावडे मित्रमंडळ यांच्या वतीने कणकवलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२० ते २३ या कालावधीत विविध सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार २० ते रविवार २२ जून या दरम्यान अंडरआर्म डे-नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. रविवार २२ जून रोजी सकाळी १० वा. रक्तदान शिबिर, संध्याकाळी ५ वाजता रस्सीखेच स्पर्धा, सोमवार २३ जून संध्याकाळी  ७ वा. दशावतारी नाट्यप्रयोग आयोजित केला आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रात्री ९ वा. गोट्या सावंत व समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीनेमंत्री नितेश राणे यांचा  उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.