
सावंतवाडी : सरमळे येथील सातेरी भगवती कला क्रीडा मंडळातर्फे सातेरी भगवती मंदिरात ११ व १२ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रविवारी सकाळी आठ वाजता प्रभातफेरी, सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन, दुपारी १२ वाजता जिल्हास्तरीय भजन स्पर्धेला प्रारंभ, रात्री ९.३० वाजता भजन स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० महाआरती आटोपल्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ होणार आहे. सायंकाळी ३.३० वाजता महिलांसाठी हळदी कुंकू आणि संगीत खुर्ची व खेळ पैठणीचा कार्यक्रम, सायंकाळी ६.३० वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळाचे (सरमळे) भजन, सायंकाळी ७ वाजता जादुगार वैभवकुमार यांचे जादुचे प्रयोग, रात्री ८ वाजता लकी ड्रॉ वितरण, ८.३० वाजता लहान मुलांचे डान्स, रात्री ९.३० वाजता नवोदित कलाकारांचे दशावतारी नाटक होणार आहे.
कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष संजय गावडे, उपाध्यक्ष शिवांकर गावडे, सचिव मंगेश सावंत, खजिनदार विजय गावडे यांनी केले आहे.