भंडारी मंडळाच्यावतीने प्रा. सुषमा मांजरेकर यांचा सन्मान !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 07, 2024 17:32 PM
views 168  views

सावंतवाडी : तालुका भंडारी मंडळातर्फे आयोजित वधू-वर स्नेहमेळाव्यात महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महविद्यालयाच्या शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर यांचा व त्यांच्या आई वडिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. सौ. मांजरेकर यांना हा मिळालेला महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणजे तमाम भंडारी बांधवांचा  सन्मान आहे. या पुरस्काराने प्रत्येक समाज बांधवांची अभिमानाने मान उंचावली आहे . सौ मांजरेकर यांनी आपले शिक्षणिक कार्य यापुढेही सुरू ठेवावे, असे गौरवोद्गार मान्यवरांनी यावेळी काढले.


यावेळी अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, सावंतवाडी  तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर, माजी अध्यक्ष अतुल बंगे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजू कीर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, माजी नगरसेवक सुधीर अडिवरेकर, माजी जि प अध्यक्ष मधुमती बागकर, माजी जि. प. सभापती शर्वणी गावकर, उन्नती धुरी आदी उपस्थित होते.