कणकवली महाविद्यालयातील प्रा.सुरेश पाटील यांना पीएचडी

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 14, 2025 20:14 PM
views 34  views

कणकवली : कणकवली महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक  सुरेश बळवंत पाटील यांना मुंबई विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान केली. प्रा. पाटील यांनी 'ऑप्टिमायझेशन ऑफ प्रोडक्शन अँड कॅरेक्टरायझेशन ऑफ किराटीनेज एंजाइम प्रोड्युस्ड बाय बॅकटेरियम आयसोलेटेड फ्रॉम पोल्ट्री वेस्ट' या महत्वपूर्ण विषयावरील अभ्यासपूर्ण शोधप्रबंध मुंबई विद्यापीठास सादर केला होता. विद्यापीठाने हा प्रबंध स्वीकारून मुलाखतीनंतर प्रा. पाटील यांना 'विद्यावाचस्पती'  ही सर्वोच्च पदवी प्रदान केली. 

सदर संशोधनामध्ये पाटील यांनी संशोधनामधून शोधलेला जिवाणू  व त्याची उत्प्रेरके हे कृषी क्षेत्रात खत निर्मितीसाठी आणि औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण विरहित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वापरात येऊ शकतात, असे स्पष्ट केले आहे. संशोधनासाठी पाटील यांना मुंबई येथील  सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. के. अरुणा समुद्रविजय यांचे मार्गदर्शन मिळाले. 

प्रा. सुरेश पाटील हे कणकवली महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून राष्ट्रीय सेवा योजना, नोकर भरती कक्ष या विविध विभागाच्या माध्यमातून महाविद्यालय, विद्यार्थी व समाजसेवा या उपक्रमासाठी ते क्रियाशील असतात. पीएच.डी. पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा कणकवली महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.