प्रा. सचिदानंद कनयाळकर यांची NCP ओबीसी विभाग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती..!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 29, 2023 14:20 PM
views 99  views

कुडाळ : शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची आवड असलेले  प्रा. सचिदानंद कनयाळकर यांनी आदरणीय पवार साहेब यांच्या कार्यप्रणालीला प्रेरित होऊन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनात तसेच प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने दोडामार्ग येथे आयोजित जिल्हा राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते प्रा.सचिदानंद कनयाळकर यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा या पदाचे  नियुक्तीपत्र देण्यात आले.

प्रा. सचिदानंद कनयाळकर यांना पूर्वीपासूनच सामाजिक कार्याची आवड आहे. १७ वर्षे स्टील इंडस्ट्री मध्ये काम करताना नेहमीच कामगारांच्या हिताचा विचार केला कामगार पतसंस्था कार्यकारणी सदस्य, पर्यवेक्षक( supervisor) वर्गासाठी कारखाना बंद होताना नुकसान भरपाई मिळण्यासाठी विशेष मेहनत घेतली तसेच कामगारांना निवृती वेतन मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन व वैयक्तिक मदत करतात. शिक्षणाची विशेष आवड असल्यामुळे १७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर पुढील शिक्षण पूर्ण केले व शिक्षण क्षेत्रात एका मोठ्या पदावर सेवा बजावत आहेत.
सामजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी राजकीय पक्षात प्रवेश घेतला आहे. त्यांचे काका श्री. बाळ कनयाळकर हे मागील २५ ते ३०  वर्षे माननीय श्री. शरदचंद्रजी पवार यांच्याबरोबर कार्यरत आहे श्री. बाळ कनयाळकर व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रा. सचिदानंद कनयाळकर यांनी राजकीय प्रवेश केला आहे. जिल्हाध्यक्ष श्री. अमित सामंत यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रा. सचिदानंद कनयाळकर यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. श्री. बाळ कनयाळकर व ओबीसी प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. राज राजापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. कनयाळकर ही जबाबदारी निश्चित यशस्वीपणे सांभाळतील. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यपद्धती त्यांना या पदावर काम करताना उपयोगी पडणार आहे.