प्रा. रमाकांत गावडे यांना पीएच. डी.

Edited by: भगवान शेलटे
Published on: May 26, 2024 14:44 PM
views 109  views

बांदा : येथील गोगटे -- वाळके कला व वाणिज्य महाविद्यालयातील  प्रा.  रमाकांत सीताराम गावडे यांना राजस्थान येथील श्री. जे.जे.टी. विद्यापीठाकडून ‘ कॉमर्स या विषयात ‘विद्या वाचस्पती’(पीएच.डी.) पदवी प्राप्त झाल्याबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन होत आहे हे  यश  संपादन  करताना शिक्षण प्रसारक  मंडळाचे अध्यक्ष मा.डी. बी.वारंग , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ  जी. जी. काजरेकर संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल  मार्गदर्शन  लाभले.

त्यांच्या संशोधनाचा विषय ‘‘कोकणातील काजू  कारखान्यात काम  करणाऱ्या कामगारांच्या आर्थिक  आणि  सामाजिक समस्यांचा अभ्यास" हा होता.त्यांना   मार्गदर्शक  म्हणून प्रा. मुकेश शर्मा ( राजस्थान)  तसेच सहाय्यक मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ.  विलास झोडगे (संत राऊळ महाराज महाविद्यालय , कुडाळ यांचे  मार्गदर्शन लाभले. प्रा.  रमाकांत  गावडे यांनी सदर शोधप्रबंधामध्ये सिंधुदुर्ग  जिल्हयांतील 217  कारखान्यातील जवळजवळ  400 कामगारांचा अभ्यास करून उपलब्ध माहितीचे वर्गीकरण व विश्लेषण केले .कामगारांना  कोणकोणत्या अडचणी येतात व त्यांच्या  आर्थिक आणि सामाजिक समस्या काय आहेत,त्यांना कोणत्या सोईसुविधा पुरवितात, त्याची पूर्तता करण्यासाठी आजच्या काळात सेवा-सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण  वाढ करण्यास काय  करणे आवश्यक आहे,तसेच  काजू कारखान्यात काम करणा-या कर्मचा-यांना येणा-या  इतर समस्या याविषयी सविस्तर संशोधनात्मक निष्कर्ष काढले आहेत. त्यांच्या या संशोधनात्मक कार्याचा कोकणातील  काजू कारखान्यांचा विकास व वृद्धी होण्यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे.

प्रा. रमाकांत  गावडे हे मागील 27 वर्षापासून  बांदा येथील डॉ. गायतोंडे  यांनी  स्थापन केलेल्या गोगटे- वाळके महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक  म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून कॉमर्स या विषयातून एम.कॉम. आणि अर्थशास्त्र विषयात एम.ए. पदवी  संपादन केली आहे.  तसेच त्यांनी कामगारां संबंधित यु. जी. सी.; व  मुंबई विद्यापीठाचे लघु संशोधन प्रकल्पही  पूर्ण  केले   आहेत.त्यांचे कॉमर्स विषयाशी निगडित विविध विषयांवरील संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत. या त्याच्या  यशात  त्यांच्या  कुटुंबाचा  मोठा वाटा आहे तसेच प्राथमिक शिक्षिका  म्हणून कार्यरत असलेल्या  त्यांच्या पत्नी सौ.रेश्मा  रमाकांत  गावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

त्यांच्या या यशाबद्दल  सर्वच  स्तरातून  अभिनंदन होत  आहे शिक्षण प्रसारक  मंडळ  बांदाचे अध्यक्ष   मा. डी.बी.वारंग  व कॉलेजचे  प्राचार्य,सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.