
सावंतवाडी : टोपीवाला अध्यापक विद्यालय, मालवण येथे कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक- प्रशिक्षक प्रा. नागेश कदम यांना नुकताच कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते कोल्हापूर येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे, कार्याध्यक्ष रवींद्र पालवे, सरचिटणीस आकाश तांबे तसेच संयोजक गौतम वर्धन, तुकाराम संघवी, पी. डी. सरदेसाई, संजय कुर्डूकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. कदम हे टोपीवाला अध्यापक विद्यालय येथे शिक्षक-प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्गनगरी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, तसेच यशदा पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करीत आहेत. ते नेहमीच शैक्षणिक संशोधनात अग्रेसर असतात. उपक्रमशील अध्यापकाचार्य म्हणून ते सातत्याने धडपड करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. प्रा. कदम यांच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, प्राचार्य हेमंत प्रभू यांनी समाधान व्यक्त केले.
प्रा. कदम यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे