कुडाळ : कै. कमला वामन मोर्ये यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेल्या रक्कम रुपये दहा हजारच्या व्याजातून माणगाव उच्च माध्यमिक विद्यालयात 'सध्याची सामाजिक परिस्थिती आणि आपले कर्तव्ये - जबाबदाऱ्या' या विषयावर सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. गणेश मर्गज यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
सदर व्याख्यानाला श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगावच्या अकरावी, बारावीतील विद्यार्थी, माणगाव वाचनालयाचे अध्यक्ष परशुराम चव्हाण, सचिव एकनाथ केसरकर, सदस्य शरद कोरगावकर, वाचनालयाचे माजी सचिव तथा माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था कार्यकारी अधिकारी वि. न. आकेरकर, विद्यालय मुख्याध्यापक श्री. प्रशांत धोंड, उपमुख्यापक पिळणकर, शिक्षक वर्ग, वाचनालय कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी या व्याख्यानास उत्कृष्ट प्रतिसाद दिला. व्याख्यान उत्कृष्ट झाल्याचे उपस्थित जाणकारांनी प्रत्यक्ष भेटीत सांगितले. एकनाथ केसरकर यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष पी. बी. चव्हाण यांनी व्याख्यात्यांचा सत्कार शाल, पुष्प व श्रीफळ देऊन केला. तसेच व्याख्याते, संस्था, शाळा विद्यार्थी यांचे आभार मानले. मुख्याध्यापक धोंड यांनी वाचनालयाचे व व्याख्यात्यांचे आभार मानले.