
सिंधुदुर्ग : आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर-गोडकर यांना शिक्षक दिनी महाराष्ट्र शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मंगळवारी शिक्षक दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख दहा हजार रुपये, मानचिन्ह व प्रशास्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे टाटा थिएटर, नरिमन पॉईंट मुंबई येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, प्रधान शिक्षण सचिव रणजित सिंह देवोल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण संचालक सूर्यवंशी, आमदार कपिल पाटील, विक्रम काळे, किरण सरनाईक उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिक्षकांच्या बहुतांश समस्या शासनाने सोडविल्या आहेत. अनेक विदयार्थी हिताचे निर्णय घेतले. राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी व विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. यानिमित्ताने गुणवंत शिक्षक व त्यांना प्रोत्साहन देनाऱ्या शिक्षण विभागाचेही कौतुक करतो. महाराष्ट्र शिक्षण विभाग देशात अग्रेसर असून पंतप्रधान नेहमीच आमचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे कौतुक करतात. महाराष्ट्राला शिक्षण मंत्री चांगले भेटले, असा ते उल्लेख करतात, असेही ते म्हणाले.
यावेळी शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले, वर्धभरात शिक्षक हिताचे अनेक निर्णय घेतले. विध्यर्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी केले. विनाअनुदानित शाळांना अनुदान दिले. आता लवकरच अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करणार आहोत. विद्यार्थ्यांना ध्यानामृत पाजण्यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. त्यांच्या योगदानशिवाय विद्यार्थ्यांची ज्ञानारजनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. अशा शिक्षकांचा आज सन्मान होत आहे. अशा शिक्षकांचा मला अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांसाठी झाटणारा प्रत्येक शिक्षक हा पुरस्कारचा मानकरी आहे. या पुरस्कारामुळे शिक्षकांमध्ये आणखी ऊर्जा येईल व भविष्यात त्यांच्या हातून चांगले दिशादर्शक कार्य घडेल, असा आशावाद व्यक्त केला. उपमुख्यमंत्री पवार यांनीही शिक्षकांना अपग्रेड होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात शिक्षण आयुक्त मांढरे यांनी सौ. मांजरेकर यांच्या कार्याचे कौतुक केले. राष्ट्रीय शिक्षण धोरण समितीवरील त्यांचे कार्य, आपत्ती काळातील आंतरराज्यस्तरीय काम, इ साहित्य निर्मिती, अध्यापन चे यु ट्यूब वरील व्हीडिओ लेखक आपल्या दारी शिक्षक विध्यर्थ्यांच्या दारी या उपक्रमाचे कौतुक करून उपक्रम शिक्षण क्षेत्राला दिशादर्शक असल्याचे सांगितले.