
सावंतवाडी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत आयोजित ४० व्या सेट परीक्षेमध्ये रसायनशास्त्र या विषयात येथील प्रा. अश्विनी अमोल कांबळे यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. अतिशय अवघड समजल्या जाणार्या या परीक्षेत त्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद असून त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. अश्विनी ह्या एसपीके ज्युनिअर कॉलेजचे जीवशास्त्राचे प्राध्यापक अमोल कांबळे यांच्या सुविद्य पत्नी आहेत.