
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठता (डीन) डॉ. सुनीता रामानंद यांच्या अनागोंदी कारभाराबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आवाज उठवत कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, डीन डॉ. सुनीता रामानंद यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. आता सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठतापदी प्रा. डॉ. मनोज जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.