
चिपळूण : चिपळूण येथील गोडबोले'ज क्लासेस चे संचालक प्रा.अमेय सुरेश गोडबोले यांचा मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. फरीदाबाद (हरियाना) येथील मॅजिक ॲण्ड आर्ट युनिव्हर्सिटी ने, तेथील द कॅस्टल ऑफ आर्ट थिएटर येथे काल शनिवार, २२ मार्च, २०२३ रोजी ,२.३० वाजता आयोजित केलेल्या, " मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड , कार्यक्रमात, भारतीय सर्वोच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील आणि इंटरनॅशनल वेलफेअर ह्युमन राईट्स फाऊंडेशन चे अध्यक्ष राम अवतार शर्मा यांचे हस्ते त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली.
शिक्षण आणि सामाजिक कार्यातील योगदान बद्दल, मॅजिक ॲण्ड आर्ट विद्यापीठ, फरीदाबाद यांची निवड परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना ही मानद डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. खाजगी क्लासेसपैकी, मानद डॉक्टरेट सन्मान मिळवणारे प्रा.अमेय गोडबोले हे कोकणातील पहिले मानकरी आहेत.
भारतातील राजस्थान, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तराखंड आदी १८ राज्यातून निवड झालेल्या ५६ व्यक्तींचा या कार्यक्रमात विविध पुरस्कार आणि मानद डॉक्टरेट देऊन सन्मान करण्यात आला. या पदवी सन्मान कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून, मेवाड विश्व विद्यालयाचे माजी संचालक डॉ.एस.के.रोहिल्ला, मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड चे चेअरमन आणि प्रसिद्ध जादूगार सी.पी.यादव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड च्या संचालक सुष्मिता डे यांनी केले.