
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातून दाखल याचिका क्र. WP(ST) NO.13145/2025 मध्ये संचमान्यतेच्या शासन आदेशास अंतरिम स्थगिती दिल्याने त्याबाबतची कार्यवाही थांबविणेत यावी असे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग ने जिल्हा परिषद प्रशासनाला केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील 193 शिक्षकांनी मे.मुंबई उच्च न्यायालयात दि.१५ मार्च २०२४ च्या संचमान्यता आदेशाविरोधात याचिका क्र. WP(ST) NO.13145/2025 दाखल केली आहे.
सदर याचिकेची सुनावणी दि.6 मे 2025 रोजी होत असताना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देताना सर्व याचिकाकर्त्यांना जैसे -थे परिस्थिती ठेवण्यासाठी सांगितलेले आहे. तसेच याचा जिल्हांतर्गत बदलीवर कोणताही परिणाम होणार नाही. असेही आदेशात म्हटले आहे.
तरी न्यायालयाचा पुढील आदेश होईपर्यंतच कोणत्याही याचिकाकर्त्यांना संचमान्यतेच्या दि.15 मार्च 2024 च्या आदेशाने अतिरिक्त ठरवता येणार नाही. याची काळजी आपण घ्यावी,असे निवेदन शिक्षक समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर व प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी सादर केले आहे.