रंगभरण स्पर्धेत मिलाग्रिसची प्रिया देसाई प्रथम

Edited by:
Published on: January 11, 2024 09:23 AM
views 142  views

सावंतवाडी : शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी आयोजित स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत तालुकास्तरीय चित्रकला- रंगभरण स्पर्धेमध्ये मिलाग्रिस हायस्कूलची प्रिया देसाई हिने प्रथम क्रमांक मिळविला. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड साल्डना यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन तिचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो, पर्यवेक्षिका मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.