खासगी हॉस्पिटल बंद ; कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गर्दी

Edited by: उमेश बुचडे
Published on: December 16, 2025 11:36 AM
views 578  views

कणकवली : कणकवली शहरांमध्ये डॉक्टर नागवेकर हॉस्पिटलची तोडफोड झाल्यानंतर डॉक्टर संघटनांनी आज 24 तास खासगी रुग्णालय बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर काही खासगी रुग्णालयाने रुग्ण तपासणी बंद ठेवली असल्याने कणकवली तालुक्यातील आजूबाजूच्या गावांमधील रुग्ण हे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. रुग्णांनी देखील सरकारी हॉस्पिटलमध्ये चांगली रुग्ण सेवा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.