
सावंतवाडी : युवासेना सावंतवाडी तालुका प्रमुख क्लेटस फर्नांडीस यांनी प्रितेश मुळीक आणि संतोष नार्वेकर यांची युवासेना सावंतवाडी उपतालुका संघटकपदी नियुक्ती केली आहे.
ही नियुक्ती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब आणि युवासेना जिल्हा प्रमुख हर्ष डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या नियुक्तीप्रसंगी जिल्हाप्रमुख संजू परब, प्रेमानंद देसाई, राकेश पवार, आणि अमित राऊळ हे उपस्थित होते.
प्रितेश मुळीक आणि संतोष नार्वेकर हे सावंतवाडी तालुक्यातील उत्साही, मेहनती व पक्षनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे युवासेनेचे संघटन सावंतवाडीत अधिक बळकट होईल, असा विश्वास युवासेना तालुका प्रमुख क्लेटस फर्नांडीस यांनी व्यक्त केला आहे.












