मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांचा सन्मान

सेवापूर्तीनिमित्त सत्कार
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 01, 2022 18:18 PM
views 282  views

वेंगुर्ला :  रा. कृ. पाटकर हायस्कूल व रा. सी. रेगे कनिष्ठ महाविद्यालय तंत्र व व्यवसाय अभ्यासक्रम वेंगुर्लाचे मुख्याध्यापक प्रकाश जाधव हे प्रदीर्घ ३९ वर्षाच्या यशस्वी सेवेनंतर नियत वयोमानानुसार दि. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले.

यावेळी त्यांना इयत्ता दहावीच्या १९९३ बॅचचे विद्यार्थी विजय गावडे, संदीप गावडे, तुषार कासार, विवेक राऊळ, प्रवीण गिरप यांच्या हस्ते श्री गणेश मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी नवनिर्वाचित मुख्याध्यापक  आत्माराम सोकटे, सहाय्यक शिक्षक महेश बोवलेकर, स्वप्नाली मुननकर, शिक्षकेत्तर कर्मचारी विजय सावंत, संध्या वेंगुर्लेकर, रमेश धूमक, सखाराम दाभोलकर, प्रसाद गोसावी आदी उपस्थित होते.