
मंडणगड : न्यु इंग्लिश तुळशी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचे निरोप समारंभानिमीत्त चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम जोशी यांचे 'शिकायला शिका' विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान, 11 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजीत करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना अध्ययनाची तेरा कौशल्ये व्यवहारातील मार्मिक उदाहरणे देऊन स्पष्ट केली. प्रत्येक समस्या आनंदाने स्विकारावी व तिचे उपाय शोधा म्हणजे जीवनात अवघड काही नाही असा सल्ला दिला. जीवनाची पाच तत्वे स्पष्ट करताना परिवर्तन हा जीवनाचा पाया व गाभा असल्याचे सांगीतले. यावेळी मुख्याध्यापिका सौ. नटे व सर्व शिक्षक, शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते.