
सिंधुदुर्गनगरी : अखिल शिक्षक संघाचे पदाधिकारी. दिव्यांग संघटनेचे राज्य पदाधिकारी, चर्मकार संघटनेचे खंदे कार्यकर्ते तसेच जि.प.पू .प्रा.शाळा कसाल नं.१ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक ( ५७) धोंडी ( आबा )नारायण चव्हाण, मूळ गांव नारुर ह्यांचे आज मंगळवार दि१९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.३० वा . कोल्हापूर येथील रुग्णालयात निधन झाले.
१५ ऑगस्ट २०२५रोजी त्यांच्यावर हृदय शस्त्रस्क्रिया झाली होती. परंतु नियतीने साथ दिली नाही. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कसाल परिसरासह ओरोस व नारुर गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर अंत्यविधी आजच सायंकाळी ५ ते ६ ह्यावेळेत त्यांच्या सध्याच्या राहते गावात ओरोस (जैतापकर ) कॉलनी येथील स्मशान भूमीत होणार आहे.