
मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टरने मालवणच्या बोर्डिंग मैदान येथे दाखल झाले आहेत. बोर्डिंग मैदान येथे प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बोर्डिंग मैदान येथे उतरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ताफ्यासह राजकोट येथे जाण्यास रवाना झाले आहेत. राजकोट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. तेथून त्यांचा ताफा हा पुन्हा माघारी फिरून सागरी महामार्ग, बसस्थानक, भरड तारकर्ली नाका येथून तारकर्ली एमटीडीसी येथे दाखल होणार आहेत. त्यानंतर तारकर्ली किनाऱ्यावर भारतीय नौसेना दीन साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीयमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यासह अन्य अतिमहनिय व्यक्ती उपस्थित आहेत.










