पंतप्रधान मोदींच्या चित्रप्रदर्शनाचं राजन तेली यांच्या हस्ते उद्घाटन

अजय गोंदावळे यांनी घेतली विशेष मेहनत
Edited by: विनायक गावस
Published on: September 24, 2022 18:26 PM
views 150  views

सावंतवाडी : देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्यावतीने  सावंतवाडी शहरात  सेवा पंधरवडा अभियान कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवार श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सर्व कामाबद्दल माहीती देणाऱ्या महानायकाच्या चित्र प्रदर्शनाच जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दोन दिवस हे प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनात नरेंद्र मोदी यांच्या जीवनासह कार्यावर आधारित माहिती देणार चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आल असून शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. त्यासाठी त्यांच विशेष कौतुक आहे असं मत माजी नगराध्यक्ष, भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी व्यक्त केले. तर गेले चार दिवस विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून दोन ऑक्टोबर पर्यंत हा सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. आजच्या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कार्याची माहिती दिली गेली असून या प्रदर्शनास भेट देण्याच आवाहन शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले आहे.   


यावेळी सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष राजन गिरप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, जिल्हा बँक संचालक रवि मडगावकर, मनोज नाईक,राजू बेग,आनंद नेवगी, प्रमोद गावडे, अजय सावंत, चंद्रकांत जाधव, हनुमंत पेडणेकर, दिपाली भालेकर,दिलीप भालेकर, सविता टोपले, केतन आजगावकर, अमित परब, विनोद सावंत ,सत्यवान बांदेकर, अनिल सावंत, पिंट्या सावंत, परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते.