पंतप्रधान मोदींचा मंत्री दीपक केसरकरांना 'हॅण्ड शेक'

भर मंचावर काय घडलं ?
Edited by: विनायक गांवस
Published on: January 20, 2023 19:38 PM
views 190  views

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई शहराच्या दौऱ्यावर आले होते. मुंबईतील वेगवेगळ्या विकासकामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. मुंबईच्या बीकेसी मैदानात विविध विकासकामांचा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसेनेच्या ठाकरे गटावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु असताना मंचावर एक वेगळा प्रकार बघायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोबाईलवर फोटो दाखवत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा शिंदे दाखवत असेलेले सर्व फोटो पाहिले. शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्या यावेळच्या संभाषणाचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोटो दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणावेळी मोदींविषयी एक किस्सा सांगितला.


पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते मुंबईतील विविध प्रकल्पांचे लोकार्पण सायंकाळी मुंबई येथे झाले. या सभेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नारायण राणे,रावसाहेब दानवे, कपिल पाटील,डॉ. भागवत कराड,रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर, कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा,दीपक केसरकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, खा. सर्वश्री मनोज कोटक, गजानन किर्तीकर, गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, राहुल शेवाळे आदी भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते उपस्थित होते.


कार्यक्रमाची सांगता मोदींच्या भाषणानंतर झाली. यावेळी मोदी  माघारी जात असताना एक विशेष प्रसंग घडला. मोदींना निरोप देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जात होते. यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड मोदींशी संवाद साधताना दिसले. मात्र, जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेत्यांनी भरगच्च असणाऱ्या व्यासपीठावर  सावंतवाडीचे सुपुत्र असणारे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी हस्तांदोलन केल. यावेळी मोदी आणि केसरकर यांच्यात संवाद देखील घडला. पंतप्रधान मोदी व त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल बोलत असताना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर गौरद्गार काढत असतात. राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर गोव्याचे नेते मनोहर पर्रीकर यांनी नरेंद्र मोदींशी दीपक केसरकर यांची करुन दिलेली ओळख व त्यानंतर केसरकरांनी हाती बांधलेल शिवबंधन हा किस्सा दीपक केसरकर काही प्रसंगात सांगतात‌. कालच्या सोहळ्यात राज्यपालांसह बडे केंद्रीय नेते, भाजप-सेना युतीचे नेते व्यासपीठावर असताना मंत्री दीपक केसरकरांना मोदींनी केलेल हस्तांदोलन व त्यांच्याशी साधलेला संवाद मात्र बरंच काही सांगून जातोय.