गळफास घेत प्राथमिक शिक्षकाची आत्महत्या

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 06, 2023 21:01 PM
views 1274  views

वैभववाडी : येथील शहरातील सॉ मिलनजीक राहत असलेले प्राथमीक शिक्षक राजा बिरू गाडीकर (वय-४३)यांनी आत्महत्या केली.घरानजीक नजीक असलेल्या फणसाच्या माळावरील झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली. हा प्रकार (आज ता.६)सायकांळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला. ते लोरे हेळेवाडी येथील शाळेत कार्यरत होते. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

   शिक्षक श्री.गाडीकर हे मुळ चांदुरी,निलंगा जि.लातुर येथील असुन सध्या ते वैभववाडी येथील सॉ मिलनजीक राहतात. लोरे हेळेवाडी येथील प्राथमीक शाळेत कार्यरत होते. दरम्यान आज सायकांळी चार वाजण्याच्या सुमारास ते घरातुन निघुन गेले. त्यानंतर सायकांळी सहा वाजण्याच्या सुमारास नजीकच असलेल्या फणसाचे माळ येथील जंगली झाडाला ते गळफासाला लटकताना आढळुन आले.

ही माहीती पोलीसांना दिल्यानंतर पोलीस हवालदार नितीन खाडे, पोलीस कर्मचारी मारूती साखरे हे घटनास्थळी पोहोचले. या प्रकाराची खबर पत्नी संगीता गाडीकर यांनी पोलीसांना दिली. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजु शकलेले नाही.त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.