
सिंधुदुर्गनगरी : गावराई गावचे पुरोहीत मुकुंद राजाराम नारळीकर वय ६५यांचे हृदय विकराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले. गेली २५ वर्षे गावराई गावचे ते पुरोहित होते. त्या बरोबरच ते गावचे मानकरीही होते. याशिवाय दशक्रोशीतही पुरोहीत म्हणून प्रसिद्ध होते.
त्याच्या निधनाने कुटुंबासह गावाचीही मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. दशक्रोशीत निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.










