वैभववाडी ग्रामीण लघुउद्योग संस्था अध्यक्षपदी गुलाबराव चव्हाण

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 27, 2023 11:29 AM
views 141  views


वैभववाडी : वैभववाडी तालुका ग्रामीण लघुउद्योग बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे माजी संचालक गुलाबराव शांताराम चव्हाण तर उपाध्यक्षपदी प्रदिप रामचंद्र प्रभू यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तालुक्यातील बलुतेदार व्यावसायिक व कामगारांना व्यावसायिक पाठबळ देण्याचे काम या बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. या संस्थेच्या कार्यकारी मंडळाचा कालावधी पूर्ण झाल्याने सहकार अधिकारी (श्रेणी १) श्रीमती भोगले यांच्या उपस्थितीत नवीन संचालक मंडळाची कार्यकारिणी निवडण्यात आली. तालुका ग्रामीण लघुउद्योग बहुउद्देशीय सहकारी संस्थेची नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे असून अध्यक्ष गुलाबराव चव्हाण, उपाध्यक्ष प्रदीप प्रभू संचालक दशरथ सुतार, रवींद्र तांबे, राजेश पडवळ, चंद्रकांत महाडिक, मोहन पडवळ, रशीदा बोबडे, शारदा लसने, लक्ष्मण बोभाटे, शांताराम नेवरेकर यांची निवड करण्यात आली. यावेळी सचिव अनंत पाटील उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित संचालकांनी अध्यक्ष गुलाबराव चव्हाण यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.