पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे जतन काळाची गरज : रामचंद्र जंगले

Edited by:
Published on: June 13, 2025 20:11 PM
views 126  views

वैभववाडी : पाणी हे मानवी जीवनातील महत्त्वाचा घटक आहे.त्यांच संवर्धनही होण गरजेचे आहे.याकरिता पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांना दुषित आणि प्रदूषणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी या पाण्याचे स्त्रोत बळकट व शाश्वत ठेवणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन गट विकाम अधिकारी रामचंद्र जंगले यांनी केले

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पंचायत समिती व जे पी एम फाऊंडेशन यांच्यावतीने जलस्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील पाच प्रतिनीधीचे दोन दिवशीय  प्रशिक्षण शिबीर येथील महालक्ष्मी हॉटेलच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते.याच उद्घाटन श्री जंगले यांच्या हस्ते झाले.यावेळी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पी .डी. जाधव , विस्तार अधिकारी विशाल चौगुले, संसाधन केंद्राच्या हर्षदा वाळके, फिजा मकानदार ,वसंत कदम सहदेव पारकर,शामल पाटकर ,गटसमन्वयक  मधुरा रावराणे ,  डाटा ऑपरेटर अंजली समजिस्कर आदी उपस्थित होते.

जंगले म्हणाले, प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहेत.हे स्त्रोत भविष्यासाठी बळकट करणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.हे स्त्रोत दुषित होणार नाहीत याची खबरदारी सर्वांनी घ्यायला हवी असं आवाहन केलं.या शिबीरामध्ये सरपंच, उपसरपंच, महिला सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा आदींचा सहभाग होता.  या प्रशिक्षणामध्ये पाण्याचे स्रोत आणि त्याचे महत्त्व , समुदाय आधारित स्त्रोत व्यवस्थापन , भूजल संशोधनाच्या पद्वधती  आणि तंत्रे , भूजल व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची प्रक्रिया ,भूजल पुनर्भरणाची तंत्रे , भूपृष्ठावरील पाण्याच्या पुनर्भरण पद्धती , भूजल पुनर्भरणाच्या नदी -नाले तंत्र , पाणी पट्टीचे महत्त्व , ग्राम आरोग्य , पोषण , पाणी पुरवठा , व स्वच्छता समितीच्या भुमिका व जबाबदारी याबाबत तज्ञांनी मार्गदर्शन केले.सर्व सहभागी सदस्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.