
कणकवली : शहरात सकाळी पाच ते सहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर नऊ ते दहा या वेळेत पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. यावेळी नागरिक छत्री घेऊन घराबाहेर पडले. अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. पण शेतकरी सुखावला. कारण नांगरणी आणि पेरणी करण्याची लगबग आता सुरू केली आहे. केरळ मध्ये दाखल झालेला पाऊस हा सिंधुदुर्ग पुढील दोन दिवसात दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आज 10 जून रोजी कणकवलीत काहीशा प्रमाणात काय होईना पण पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे.










