
दोडामार्ग : दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला कोणी वालीच नाही काय?असा प्रश्न अजूनही दोडामार्गच्या जनतेला पडला आहे. प्रसूती झालेल्या महिलांना ठेवणार कुठे? असा प्रश्न सरपंच सेवा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी विचारत दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात पाहणी केली व 07 सप्टेंबर पर्यंत कारभार सुधारा अन्यथा 08 सप्टेंबर रोजी जन आंदोलन उभारू असा इशारा यावेळी त्यांनी मीडियाच्या माध्यमातून दिला आहे.
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालायात प्रसूती कक्षच नसल्याचे बोलें जातं होते याच धरतीवर सरपंच सेवा संघटना जिल्हाध्यक्ष व मानवाधिकार सुरक्षा चे अध्यक्ष प्रवीण गवस यांनी आपल्या पदाधिकाऱ्यां सोबत दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात आरोग्य यंत्रनणेचा आढावा घेतला. यावेळी प्रसूती कक्षात डायलेसिस कक्ष उभारून प्रसूती कक्षच गायब केल्याने गवस आक्रमक झाले. यावेळी उपस्थित स्त्री रोग तज्ञ डॉ मसुरकर यांना जाब विचारत प्रसूती झालेल्या महिलांना ठेवणार कोठे असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. यावेळी डॉ. मसूरकर म्हणाके की याठीकाणी जागाच उपलब्ध नसल्याने मोठी गैर सोय निर्माण होत आहे. यावेळी गवस यांनी एका महिन्याची डेड लाईन देऊन आरोग्य यंत्रणा सुधारा अन्यथा पुन्हा जनआक्रोश आंदोलन उभाराव लागणार असल्याचे ते म्हणाले.
गरोदर महिला चक्क स्टोअर रूममध्ये
यावेळी रुग्णालयात गरोदर महिलांना सर्वसामान्य कक्षामध्ये उपचार दिले जात असल्याची चर्चा सर्वत्र केली जातं होती. यासाठी प्रवीण गवस यांनी रुग्णालयात मंगळवारी पाहणी केली असता प्रसूती कक्षात डायलेसिस कक्ष उभारून प्रसूती कक्षच गायब केल्याचे निदर्शनास आले. प्रसूती झालेल्या महिलांना चक्क औषध साठा ठेवलेल्या स्टोअर रूम मध्ये ठेवण्यात येणार असल्याचे डॉ मसुरकर यांनी सांगितले. त्यासाठी त्या रूम मध्ये कोट लावण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे गरोदर महिलांना चक्क स्टोअर रूम मध्ये उपचार केल्याच निदर्शनास आले. दोडामार्ग आरोग्य यंत्रणेचे करायचे तरी काय? कुठल्याच राजकीय पदाधिकाऱ्यांना आरोग्याचे सोयर सुतक नाही काय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
महिन्याभराची डेडलाईन
दोडामार्गची आरोग्य यंत्रणा महिन्यात भरात सुधारा प्रसूती कक्ष महिलांच्या सेवेत आणा अन्यथा चतुर्थी नंतर ग्रामीण रुग्णालया समोर भव्य जन आंदोलन उभारल जाणार असल्याचे ते म्हणाले.