माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळा सोमवारी !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 18, 2024 12:38 PM
views 77  views

सावंतवाडी : माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले हे उद्या 75 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. याचे औचित्य साधून प्रवीणभाई भोसले मित्रमंडळ व भोसले कुटुंबीय यांच्यावतीने प्रवीण भोसले यांचा अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळा उद्या सोमवार 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता आरपीडी हायस्कूल सावंतवाडी येथे आयोजित केला आहे.


प्रामाणिक व निष्कलंक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून प्रवीण भोसले सर्वत्र परिचित आहेत. माजी केंद्रीय मंत्री जनरल जगन्नाथराव भोसले, माजी आमदार प्रतापराव भोसले यांचा राजकीय, सामाजिक वारसा पुढे घेऊन जाण्याच काम प्रवीण भोसले यांनी केल.  त्यांनी आपल्या आमदारकी व राज्यमंत्री पदाच्या कालावधीत बरीच विकास कामे केलीत. उद्या त्यांचा 75 वा वाढदिवस असून या अमृत महोत्सवा प्रसंगी सर्वपक्षीय नेते सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप हे उपस्थित राहणार आहेत.


त्याच बरोबर प्रवीण भोसले यांचे बंधू रवींद्र भोसले, कर्नल सुभाष भोसले, धैर्यशील भोसले, अजयसिंह भोसले, आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार शिवराम दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश दळवी, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे, कॉंग्रेस नेते विकास सावंत, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, अॅड. संदीप निंबाळकर, व्हिक्टर डॉन्टस आदींची प्रमुख उपस्थित राहणार आहेत.


या अमृत महोत्सवी सोहळ्यास उपस्थित राहण्याच आवाहन अजयसिंग शिवाजीराव भोंसले, संदेश पारकर, सौ. रेश्मा सावंत, जयप्रकाश चमणकर, शरद बाळाजी सबनीस,अमित सामंत, अॅड. संदिप निंबाळकर, डी. जी. सावंत, राजू बेग, अॅड. दिगंबर गांवकर, नारायण सावंत, राजा स्वार, प्रमोद सावंत, प्रसाद रेगे, विनोद सावंत, भगवानराव देसाई, सुभाष भिसे, मनोज सावंत, पुंडलिक दळवी, प्रकाश मसुरकर, रमेश बोंद्रे, विश्वनाथ आडारकर, बाळा बोर्डेकर,गणपत देसाई,अबुलभाई शेख,अभिषेक सावंत, ऑगस्तिन फर्नांडीस,रविंद्र म्हापसेकर, संदिप राणे, मधुकर देसाई, देवा टेमकर, सतिश सुराणा,प्रविण देसाई,राजू गांवकर,अमोल सावंत, श्रीम. माया वाडकर, अॅड. सौ. सायली दुभाषी, मनोज वाघमोरे, चंदू मुळीक, मिहीर मठकर, योगेश कुबल, पांडुरंग गावकर यांसह प्रवीणभाई भोंसले मित्रमंडळ व कुटुंबियान केलं आहे.