
सावंतवाडी : माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सिंधुदुर्गच्या विकासात भर घातली. शेतकऱ्यांच्या जीवनात विकासाची गंगा आणली असे उद्गार काढत महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रवीण भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. केक कापून त्यांच्या निवासस्थानी हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अमित सामंत, व्हिक्टर डॉंन्टस, प्रसाद रेगे, बबनराव साळगावकर, नम्रता कुबल, अँड. रेवती राणे, अँड. सायली दुभाषी, सावली पाटकर, राजन कळंगुटकर, काशिनाथ दुभाषी, प्रा. सचिन पाटकर, विलास सावळ, बबन पडवळ, मनोज वाघमोरे,इर्शाद शेख,विकास सावंत, अँड. दिलीप नार्वेकर, महेंद्र सांगेलकर, विधाता सावंत, वासुदेव नाईक, रवींद्र म्हापसेकर, साक्षी वंजारी, अमिती मेस्त्री, अमोल सावंत, स्मिता वागळे,रावजी राणे, देवदास आडाळकर, विनोद पावसकर, बाळ चोडणकर, अँड. राघवेंद्र नार्वेकर, नारायण सावंत आदी उपस्थित होते.