
सावंतवाडी : मंत्री म्हणून सत्तेतली ताकद, जादू केसरकरांकडे आहे. मात्र, ती केसरकरांना कळली नाही. जनतेसाठी, विकासासाठी त्यांनी याचा वापर केला नाही. सहज होणारी काम करता आली नाहीत. त्यामुळे यांना मत घालू नका, ते आता काम करणार नाहीत. इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून द्या, परिवर्तन करा असं आवाहन माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केल.
ते म्हणाले, माझ्याजवळ शरद पवार होते तसे यांच्याकडे एकनाथ शिंदे आहेत. मात्र, मंत्रीपदाचा उपयोग ते इथल्या भागासाठी करू शकले नाहीत. पद घेत आहेत पण सहज होणारी काम करत नाहीत. त्यामुळे यांना मत घालू नका, ते आता काम करणार नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून द्या असं आवाहन माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केलं. सावंतवाडीनं आमच्या कुटुंबाला महत्वाचे स्थान दिलेल आहे. त्यामुळे मी हे आवाहन करतो आहे असं ते म्हणाले.
तर, लोकसभेप्रमाणे विधानसभेत विरोधक लोकांना आमिष दाखवतील. मात्र, त्यांनी भुलू नये. महाविकास आघाडीला कराव, सावंतवाडीतून इंडिया आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्या मागे रहावं, त्याला विजयी करावं. १५ वर्षांत झालेल्या चुका आता सुधारायच्या आहेत. विकास खऱ्या अर्थानं करायचं आहे. केवळ घोषणा करण्याची संस्कृती आता नको आहे. दीपक केसरकर हे मंत्री म्हणून कमी पडले. त्यांना सत्तेचा वापर जनतेची कामं करण्यासाठी करता आला नाही. राज्य पातळीवर काम करताना खेडोपाड्यात काय चालू आहे याची कसलीही चिंता त्यांना नाही अशी टीका त्यांनी केली. तसेच दरवर्षी गणेशोत्सव येतो. पण, मंडळांना पेटी, तबला आताच देणार आहेत. मागच्या दोन वर्षात द्यावस वाटलं नाही. देण्याबाबत म्हणणं नाही. मात्र, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही करू नये. देवभक्ती भक्ती मार्गानेच करावी असा टोला हाणला. तसेच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सावंतवाडी बसस्थानक, पंचायत समिती इमारत, कबुलायतदार गांवकर प्रश्न, आयटीआय, शिक्षण विभागातील निर्णय यावरुन त्यांनी केसरकरांना लक्ष केलं