
सावंतवाडी : शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबाबत माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय या प्रशालेत तब्बल १८ वर्षांपासून उपक्रमशील शिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रवीण मालोजी सानप यांना 'वसंत स्मृती आदर्श शिक्षक' पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात
आले. हा पुरस्कार ठाणे येथे भाजप शिक्षक आघाडी कोकण विभागाच्यावतीने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला. शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांचे वडील वसंत डावखरे यांच्या नावाने हा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो.
प्रवीण सानप हे सद्या तुळस येथील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी हायस्कूल येथे कार्यरत असून उपक्रमशील
शिक्षक म्हणून अभिनव पद्धतीने विविध नाविन्यपूर्ण अध्यापन करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटत आहेत. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंद होत आहे.