
सावंतवाडी : दक्षिण कोकणचं पंढरपूर सोनुर्लीच्या देवी माऊली माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांनी दर्शन घेतले. यावेळी सर्व शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिलांना सुखी ठेव, त्यांची प्रगती कर असं साकडे त्यांनी देवीच्या चरणी घातले. यावेळी देवस्थान समितीच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित भक्तांना माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. यावेळी देवस्थानचे मानकरी राजा गावकर, बाबा गावकर आदी उपस्थित होते.










