
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब या पक्षाने उमेदवारी डावलल्याने लखोटा या चिन्हावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. याबाबत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्याप्रमाणे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेश स्तरावर पोहचविण्याचे ठरले. त्याप्रमाणे सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष यांना पाठविण्यात आला होता. त्या अहवालाचा कुठलाही निर्णय प्रदेशाध्य स्तरावरून प्राप्त होण्याअगोदरच ९ नोव्हेंबर रोजी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन अर्चना घारे परब यांचे सह वेंगुर्ला, दोडामार्ग, सावंतवाडी या तीन तालुका अध्यक्ष यांना पक्षातून बडतर्फ केल्याचे जाहीर केले होते. मग जिल्हा सरचिटणीस म्हणून भास्कर परब यांना बडतर्फीचे अधिकार नसताना भास्कर परब यांचे नाव बडतर्फी घटनेला जोडणे चुकीचे असून तसेच अन्य काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी होणार असे माझ्या नावाचा उल्लेख करून सनसनाटी निर्माण केली यास माझा काडीमात्र संबंध नाही, पक्षाचे पदाधिकारी वा कार्यकर्त्यांना बडतर्फ करण्याचे अधिकार हे प्रांताध्यक्ष यांनाच आहेत. तसेच माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी ९ नोव्हेंबरलाच बडतर्फ केले त्यामुळे पून्हा बडतर्फी माझ्या नांवे कशी असा प्रश्न उपस्थित करून कालच्या बडतर्फीशी माझा संबंध नाही. तसेच माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी ९ नोव्हेंबरला कशाच्या आधारे त्यांची बडतर्फी केली होती याचे स्पष्टीकरण द्यावे असे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस भास्कर परब यांनी सांगितले आहे.