
सावंतवाडी : माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस सोहळ्यानिमित्त सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या अभीष्टचिंतन सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्हयातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, तर अध्यक्षस्थानी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले होते.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आदी सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. या वाढदिवस सोहळ्याचे आयोजन प्रवीण भोसले मित्रमंडळाने केले होते. प्रास्ताविक अर्चना घारे परब यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अँड नकुल पार्सेकर, विकास सावंत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,मनिष दळवी, रविंद्र भोसले, आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. अजातशत्रू व निष्कलंक असं व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आहेत. आजकालच्या राजकारणात त्यांच्यासारखी माणसं दिसत नाही. त्यांचा अमृत महोत्सव आज आम्ही साजरा करत आहोत. त्यांची शंभरी सुद्धा मोठ्या दिमाखात साजरी करू अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या. माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप व संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले यांच्या हस्ते प्रवीण भोंसलेंचा सत्कार करण्यात आला. तर केक कापून अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर,माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले, सौ. अनुराधा भोंसले, खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, रविंद्र भोंसले, राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, राष्ट्रवादीचे नेते व्हिक्टर डॉन्टस, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत, उबाठा गटाचे संदेश पारकर, संजय पडते, बाळा गावडे, प्रसाद रेगे, माजी नगराध्यक्ष संजू परब, अनंत पिळणकर, संदीप घारे, अँड. नकुल पार्सेकर, पुंडलिक दळवी, नारायण सावंत, रूपेश राऊळ, सी.एल.नाईक आदी उपस्थित होते.