
सावंतवाडी : रविवार दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी एँट्रीया हाॅल, कोल्हापूर येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माईण नंबर एकच्या उपक्रमशील पदवीधर शिक्षिका प्रतिक्षा प्रसाद तावडे यांना कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचा (कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा) राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अॅवाॅर्ड सन २०२३' मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
नंदिनी गृहउद्योग कोल्हापूरच्या संस्थापक अध्यक्षा सुमित्रा पाटील यांच्याहस्ते प्रतिक्षा तावडे यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्या करत असलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
सौ. तावडे ह्या सामाजिक उन्नतीबद्दल करीत असलेली नि:स्वार्थी समाजसेवा मोलाची भर घालणारी आहे. विविधतेतून एकता व ऐक्य जोपासण्याची सांस्कृतिक परंपरा आपल्या कार्यक्षेत्रातून रुजवत आहेत. राज्यघटनेची समता व बंधुता ही तत्त्वे प्रमाणभूत माणून सामाजिक व धडाडीने समाजसेवा करण्याची तळमळ या गुणांचा आणि निष्ठावान जागरुक नागरिक म्हणून कार्यान्वित आहेत. हे कर्तृत्व अत्यंत अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे. हे कार्य उत्तरोत्तर वाढत जावो, नावलौकिक होत समाजाचाही विकास व्हावा, ही शुभेच्छा ! अशा सन्मानपत्राने त्यांचा गौरव करण्यात आला. कोल्हापूरी फेटा, मेडल, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.