प्रतिभा माणगावकर यांचे निधन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 18, 2025 20:35 PM
views 483  views

कणकवली : कणकवली बाजारपेठेतील आंबेआळी येथील रहिवासी श्रीमती प्रतिभा सुरेश माणगावकर उर्फ माई (८०)यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मीतभाषी असलेल्या प्रतिभा यांनी कणकवली शहरात अनेक गोरगरिबांना मदतीचाही हात दिला होता. गेली अनेक वर्ष कणकवली ग्रामपंचायतचे सरपंच असलेले पती सुरेश माणगावकर यांच्यासोबत प्रतिभा  यांनी शहर विकासाबरोबरच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात योगदान दिले होते.

त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. त्या सामाजिक कार्यकर्ते नितीन व निलेश माणगावकर यांच्या मातोश्री तर प्राथमिक शिक्षिका श्रद्धा माणगावकर यांच्या त्या सासू होत.